बीड : नेकनुर ते मांजरसुंभा दरम्‍यान गवारी फाट्यावर लोखंडी गज उघडे पडल्‍याने अपघाताला निमंत्रण | पुढारी

बीड : नेकनुर ते मांजरसुंभा दरम्‍यान गवारी फाट्यावर लोखंडी गज उघडे पडल्‍याने अपघाताला निमंत्रण

बीड : पुढारी वृत्‍तसेवा अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावर नेकनुर ते मांजरसुंभा दरम्यान गवारी फाट्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ते कामासाठी वापरण्यात आलेले लोखंडी गज उघडे पडले आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन, संबंधीत प्रकरणात जबाबदार ठेकेदार एचपीएम कंपनी व अभियंत्यावर कारवाई करण्यात येऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे, मुख्य अभियंता म.रा.र.वि.म (मर्या) मुंबई यांना केली आहे.

जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा अवमान

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी दुरावस्थे संदर्भात डॉ.गणेश ढवळे यांनी दि.०२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने अपर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत यांनी प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाही करणेबाबत कळवले होते. मात्र या घटनेला ५ महिने होऊनही कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवमानना प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

हेही वाचा :   

Back to top button