पुण्यात भंगाराच्या दुकानाला भीषण आग! हवेत पसरले धुराचे लोट | पुढारी

पुण्यात भंगाराच्या दुकानाला भीषण आग! हवेत पसरले धुराचे लोट

पुणे : पुण्यातील कर्वेनगर येथील नदीपात्रालगत असलेल्या भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग मोठ्या प्रमाणात पसरत असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. दुधाणे लॉन्स या परिसरामध्ये भंगारची अनेक दुकाने असून येथील सामानाला आग लागली आहे. या ठिकाणी जुने टीव्ही, फ्रिज, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. या आगीत फ्रिजच्या कॉम्प्रेसरला आग लागल्यामुळे फुटण्याच्या घटना देखील घडत आहेत.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता, वारजे, कोथरूड, एरंडवणा येथील अग्निशमन दलाचे पंप घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पीएमआरडीएकडील पाण्याचे टँकर देखील घटनास्थळी पोहोचले असून आग वीजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या ठिकाणी अनेक अनाधिकृत दुकाने असून येथील भंगार सामानांना आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

नगर : ‘समृध्दी’वरील अपघातांमध्ये घट : विवेक भिमनवर

सुविधांचा मास्टर प्लॅन तत्काळ तयार करा : मंत्री विखे पाटील

नगर : दगडफेक प्रकरणी 17 जणांना जामीन

Back to top button