संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा लोणी काळभोर गावातच मुक्काम | पुढारी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा लोणी काळभोर गावातच मुक्काम

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ‘आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार्‍या पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना मार्गावर आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवल्या जातील,’ अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. बारामतीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामस्थळाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. दौंडचे आमदार राहुल कुल यावेळी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ’पालखी मार्गावर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सोयीसुविधा आहेत.

त्या कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न केला जाईल. पालखी मार्गावर वेगवेगळे प्रश्न आहेत. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, त्या-त्या ठिकाणच्या नगरपालिका, नगरपंचायती यांच्याकडील कामे आहेत. त्याचा आढावा घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली. त्यानुसार अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पालखी सोहळा नियोजनात पालकमंत्री जातीने लक्ष घालत आहेत. नियोजनात कुठे काही कमतरता राहिली असेल तर ती दूर करून सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडू,’ असेही चव्हाण यांनी सांगितले. या वेळी पत्रकारांनी अन्य राजकीय प्रश्न उपस्थित केले; परंतु ’मी पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी आलो आहे, नियोजनात काही अडचणी असतील तर त्या सांगा. मी आज पालखी सोहळा या विषयावरच बोलू इच्छितो,’ असे सांगत त्यांनी अन्य प्रश्नांवर भाष्य करणे टाळले.

हेही वाचा

वाल्हे पालखीतळाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडून पाहणी

तळेगाव ढमढे : जबरी चोरी, घरफोडी करणारा सराईत जेरबंद

खडकवासला तलावात ’रेगाट्टा’चा समारोप

Back to top button