वाल्हे पालखीतळाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडून पाहणी | पुढारी

वाल्हे पालखीतळाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडून पाहणी

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील वाल्हे (ता. पुरंदर) येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी शनिवारी (दि. 17) विसावणार आहे. येथील पालखीतळाची पाहणी व पालखी महामार्गाची पाहणी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. वाल्हे येथील पालखी मैदानावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज विसावा ओट्याचे त्यांनी दर्शन घेतले तसेच त्यांनी ग्रामस्थांकडून अडीअडचणींबाबत माहिती घेतली.

या वेळी दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, नायब तहसीलदार मिलिंद घाडगे, प्रभारी तहसीलदार दत्तात्रय गवारी, गटविकास अधिकारी डॉ. अस्मिता पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता स्वाती दहिवाल, दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणेचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदींसह पोलिस, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी ग्रामस्थांनी पालखीतळापासून पर्यायी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, या निधीतून हा रस्ता पूर्ण होत नसल्याने या रस्त्याचे काम अर्धवट राहील. त्यामुळे या रस्त्यासाठी अधिक निधी उपलब्ध देऊन हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी केली. मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राहिलेला रस्ता पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.

या वेळी सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, पुरंदर-हवेली भाजपचे विधानसभा निवडणूकप्रमुख बाबाराजे जाधवराव, युवा मोर्चाचे सचिव शैलेश तांदळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, उद्योजक सुनील पवार, राहुल यादव, तानाजी पवार, सागर भुजबळ, प्रदीप चव्हाण, बाळासाहेब पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा

विखे-शिंदे यांच्यातील गैरसमज दूर ; वाद संपला : महसूलमंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण

भिगवण : महिला खून प्रकरणाचा 48 तासांत उलगडा

नेपाळमध्ये आज रुद्राक्ष लिंगार्चन सोहळा

Back to top button