खडकवासला तलावात ’रेगाट्टा’चा समारोप | पुढारी

खडकवासला तलावात ’रेगाट्टा’चा समारोप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला तलावात झालेल्या वॉटर राफ्टिंग स्पर्धेचा समारोप शुक्रवारी (दि.9) एनडीएचे व्हॉईस अ‍ॅडमिरल अजय कोचर यांच्या उपस्थितीत झाला. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. एनडीए इनलँड एंटरप्राइझ क्लास रेगाट्टाच्या सातव्या आवृत्तीचा समारोप झाला. या स्पर्धेत नागरी आणि सेवा क्लबसह 82 संघ आणि 164 सहभागी झाले होते. रेगट्टामध्ये आर्मी यॉटिंग नोडने प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला, तर भारतीय नौदल वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटर, कोचीने तिसरे स्थान पटकावले.

कॅडेट जस्मिन आणि उदिता हल्दी यांचा समावेश असलेला एनडीए संघाने सर्वोत्कृष्ट महिला संघ म्हणून कामगिरी केली. कॅडेट जस्मिन ही राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारी पहिली महिला ठरली. या कार्यक्रमात 12 वर्षांखालील 12 मुलांच्या सहभागाचे स्वागत करण्यात आले. रेगाट्टा सहभागींना सीडीआर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांना भेटण्याचे आणि संवाद साधण्याचे भाग्य लाभले. टॉमी यांनी गोल्डन ग्लोब रेस 22 पूर्ण केली आणि 238 दिवस आणि 14 तासांच्या एकल प्रदक्षिणेनंतर दुसरे स्थान मिळवलेले आहे.

हेही वाचा

मराठमोळया अप्सरा सोनाली कुलकर्णीचं आता काय करावं!

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यात कलाकारांकडून जागर

विखे-शिंदे यांच्यातील गैरसमज दूर ; वाद संपला : महसूलमंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण

Back to top button