भिगवण : महिला खून प्रकरणाचा 48 तासांत उलगडा | पुढारी

भिगवण : महिला खून प्रकरणाचा 48 तासांत उलगडा

भिगवण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भिगवणजवळील भकासवाडी येथील महिलेच्या खून प्रकरणाचा तपास भिगवण पोलिसांनी अवघ्या 48 तासांत करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेला अनैतिक संबंधाची किनार असून, माझा व मुलांचा सांभाळ करणार का आणि दिलेल्या पैशाचा तगादा लावल्याने आपण तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली संशयित आरोपीने दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

दादा ऊर्फ काळू श्रीरंग पवार (रा. भिगवण, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी (दि. 6) गंगुबाई ऊर्फ वैशाली कल्याण काळे (वय 47, रा. भकासवाडी-मदनवाडी, ता. इंदापूर) हिचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत भकासवाडी (मदनवाडी) येथील व्यंकटेश लॉन्सनजीक वीट भट्टीजवळ मृतदेह आढळून आला होता.

त्यानंतर शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारे भिगवण पोलिसांनी या घटनेचा तपास लावत पवार यास अटक केली. पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, सुभाष रुपनवर, रूपेश कदम, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी या पथकाने या खुनाचा उलगडा केला.

हेही वाचा

नगर : कुकडीचे आवर्तन नऊ दिवस ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून आंदोलनाची दखल

Mira Road Murder : मृतदेह विल्हेवाटीसाठी गुगल सर्च; हत्येनंतर वेबसीरिजही पाहिली

नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर

Back to top button