पुणे : ‘एक मूल-एक झाड’ संकल्पना रुजवा : अभिनेते सयाजी शिंदे | पुढारी

पुणे : ‘एक मूल-एक झाड’ संकल्पना रुजवा : अभिनेते सयाजी शिंदे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पर्यावरण दिनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश दिला जातो; परंतु त्याचे अनुकरण किती होते हा प्रश्नच आहे. मुलांना शाळेत दाखल करताना जन्मदाखल्याची अट लागते. त्याप्रकारेच प्रत्येक मुलाने झाडाचे एक बी आणावयाची अट घातली पाहिजे. जेणेकरून तो मुलगा अथवा मुलगी ज्या वेळी आपले शालेय शिक्षण पूर्ण करेल त्या वेळी त्याच्या हक्काचे एक झाड असेल, असे प्रतिपादन सह्याद्री देवराईचे संस्थापक व अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी आवश्यक असणार्‍या प्रबोधनपर साहित्यनिर्मिती करणार्‍या चैत्र क्रिएशन्स अँड पब्लिसिटी संस्थेने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून साईवाणीच्या सहकार्याने पर्यावरणविषयक प्रबोधनपर साहित्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी साईवाणी संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. डॉ. सुनील नानासाहेब करपे यांची विशेष उपस्थिती होती.

संस्थेच्या संस्थापक व संचालिका चित्रा मेटे म्हणाल्या, विद्यार्थ्यांमध्ये लहान वयामध्ये पर्यावरणविषयक जाणीव विकसित करण्यासोबतच त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य, स्मृती व तर्कविकास सर्जनशीलता, आत्मविश्वास, हस्तनेत्र समन्वय, निरीक्षणशक्ती, कौशल्ये या गुणांचा विकास होण्यासाठी हे प्रबोधनपर साहित्य उपयुक्त आहे.

हेही वाचा

भारत संरक्षण दलाच्या उत्पादनातील निर्यातीत 23 पट वाढ !

पुणे : माउंट एव्हरेस्ट मोहिमेस गेलेल्या स्वप्निल गरड यांचा मृत्यू

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना पवार, ठाकरे यांचे पाठबळ : खा. किरीट सोमय्या

Back to top button