औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना पवार, ठाकरे यांचे पाठबळ : खा. किरीट सोमय्या | पुढारी

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना पवार, ठाकरे यांचे पाठबळ : खा. किरीट सोमय्या

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शिंदे-फडवणीस सरकार याला आळा घालण्यास समर्थ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात अशा प्रवृत्तींना पाठबळ दिले गेले, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.

ते म्हणाले, महाराष्ट्रासह देशभरात चर्चेचे ठरलेले मंचर येथील कथित लव्ह जिहाद प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी सहकार्य करावे. गेल्या काही दिवसांत राज्यात लव्ह जिहादचे प्रकार उघडकीस येत आहेत, ही चिंताजनक बाब आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार सरकारच्या काळात लव्ह जिहाद करणार्‍या प्रवृत्तीला बळ दिले गेले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सोमय्या यांनी दिला. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. या ठिकाणी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांची गय केली जाणार नाही.

हेही वाचा

भारत संरक्षण दलाच्या उत्पादनातील निर्यातीत 23 पट वाढ !

पुणे : निवृत्त कर्नलही अडकला टास्क फ्रॉडच्या जाळ्यात

Pudhari Editorial : वर्चस्वाचा खेळ!

Back to top button