पुणे-मुंबई मार्गावर सर्वांत लांब जुळे बोगदे | पुढारी

पुणे-मुंबई मार्गावर सर्वांत लांब जुळे बोगदे

पुणे : मुंबई ते पुणे हा नवा मिसिंग लिंक रस्ता डिसेंबर 2024 पर्यंत तयार केला जाणार असून, अवघ्या दोनच तासांत मुंबई ते पुणे प्रवास करता येणार आहे. जगातील सर्वांत लांबीचे जुळे बोगदे या रस्त्यावर होणार असल्याची माहिती मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री रविवारी शहरात आले होते. त्यांनी राज्यातील रस्त्यांच्या विकासकामांचे उद्घाटन ऑनलाइन पध्दतीने केले.

या वेळी त्यांनी ही सुखद वार्ता पुणेकरांना दिली. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वांत आधी एक्स्प्रेस- वे बांधला तेव्हाही अनेक लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला. कशाला हवा इतका मोठा प्रकल्प असे म्हणत बोटं मोडली. मात्र, पुढे त्याची उपयुक्तता सर्वांनाच समजली. आता तोही रस्ता कमी पडत आहे म्हणून नवी मिसिंग लिंक मुंबई ते पुणे तयार होत आहे. या प्रकल्पाची लांबी 13.3 किलोमीटर असेल यात जुळे बोगदे राहतील. जगातील सर्वांत मोठ्या लांबीचे हे बोगदे असणार आहेत. पहिल्याची लांबी 1.75 कि.मी., तर दुस-याची लांबी 8.92 कि.मी. राहील. हा रस्ता खोपोली ते कुसगाव रस्त्याला जोडला जाईल.

काय होणार फायदा..

या रस्त्यामुळे खंडाळा घाटातील नागमोडी वळणे टाळता येतील. तसेच भूस्खलन थांबवणे शक्य होईल. वळणं कमी झाल्याने अंतर 6 किमीने कमी होईल. प्रवासाचा एकूणवेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी होऊन अपघात कमी होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

असा असेल बोगदा..
लांबी ः13.30 कि.मी
रुंदी 23.50 मीटर
8 लेन राहतील
70 टक्के काम पूर्ण
मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार
एकूण अंदाजे खर्च:
रु. 6695.36 कोटी
प्रकल्पाची एकूण लांबी:
13.30 किमी

हेही वाचा

काडेपेटीसारख्या घरात बेडरूम आणि किचन!

दगडांनी भरलेले रहस्यमय संग्रहालय!

व्हिडीओ पाहून कुकिंग करत असाल तर हे नक्की वाचा!

Back to top button