काडेपेटीसारख्या घरात बेडरूम आणि किचन! | पुढारी

काडेपेटीसारख्या घरात बेडरूम आणि किचन!

न्यूयॉर्क : भारतात स्थित अनेक नागरिकांचे विदेशात वास्तव्य करण्याचे स्वप्न असते. विदेशात नोकरी मिळाल्यानंतर आपले आयुष्य सुखमय होऊन जाईल, असे मनात कुठे तरी वाटत असते. पण, म्हणतात ना दुरून डोंगर साजरे. तसेच काही प्रमाणात विदेशाचे देखील आहे. विदेशातील आयुष्य नेहमी कम्फर्टेबलच असते, असे वाटत असेल तर हा किस्सा खूप काही सांगून जाईल.

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणारी अ‍ॅलेना रेंडाजो हिने सोशल मीडियावर मागील वर्षभरापासून काडेपेटीसारख्या घरात राहते आहे, त्या घराची काही छायाचित्रे पोस्ट केली. तिचे काडेपेटीसारखे घर केवळ 80 स्क्वेअर फूटमध्ये उभारले गेले असून या इतक्या कमी जागेतच लिव्हिंग रूम, बेडरूम व किचन आहे. यात फक्त बाथरूम नाही आणि कोणत्याही भिंतीला खिडक्या देखील नाहीत. याचाच अर्थ असा की, हे घर म्हणजे जणू काडेपेटीच!

अ‍ॅलेनाने या घराची छायाचित्रे पोस्ट केली, त्यावेळी सर्व लोक आश्चर्यचकित झाले. ज्या लोकांना क्लॉस्ट्रोफोबिया आहे, ते तर या घरात उभेही राहू शकत नाहीत. क्लॉस्ट्रोफोबियाचा त्रास असेल तर असे लोक छोट्या बंद घरात राहू शकत नाहीत, त्यांचा श्वास कोंडून राहू शकतो. अ‍ॅलेना या काडेपेटीसारख्या घरात राहून काय साध्य करते आहे, हे मात्र तसे गुलदस्त्यातच आहे!

संबंधित बातम्या
Back to top button