दगडांनी भरलेले रहस्यमय संग्रहालय! | पुढारी

दगडांनी भरलेले रहस्यमय संग्रहालय!

टोकियो : जगभरात अनेक रहस्ये आहेत. काही रहस्ये तर अशी आहेत, ज्यांचा उलगडा शतकानुशतके होऊ शकलेला नाही. जपानमधील टोकियो शहरानजीक देखील रहस्यमय असे एक अनोखे संग्रहालय असून या संग्रहालयात मनुष्याच्या चेहर्‍याशी साधर्म्य असणारे दगड संग्रहित आहेत. चेन्सकिकन असे या संग्रहालयाचे नाव असून ते टोकियोपासून दोन तास अंतरावर चिचिबू या शहरात वसलेले आहे.

या संग्रहालयात अनेक प्रकारचे अनोखे दगड पहायला मिळतात. अन्य संग्रहालयाप्रमाणेच या संग्रहाची देखील रचनात्मक मांडणी केली गेली असून पर्यटक ांना त्याची भुरळ पडेल, यावर भर देण्यात आला आहे.

पूर्ण संग्रहालयात जवळपास 1700 दगड समाविष्ट असून त्यातील 900 दगड अशा प्रकारचे आहेत, ज्याचा आकार मनुष्याच्या चेहर्‍यासारखा आहे. या अनोख्या संग्रहालयाची स्थापना शोझो हयामा या व्यक्तीने केली होती. नंतर 2010 मध्ये शोझोचे निधन झाले. सध्या हे संग्रहालय त्यांची पत्नी चालवत आहे.

Back to top button