कात्रज : आरोग्य विभागाच्या कारवाईत दोन लाख रुपयांचा दंड वसूल | पुढारी

कात्रज : आरोग्य विभागाच्या कारवाईत दोन लाख रुपयांचा दंड वसूल

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने गेल्या मे महिन्यात 67 ठिकाणी कारवाई करून 2 लाख 15 हजार 220 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, राडारोडा टाकणे, प्लॅस्टिकचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे आदी कारणांमुळे ही कारवाई केली. गेल्या 1 ते 31 मे या काळात ही कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छतेबाबत कारवाई करताना सर्वाधिक 1 लाख 57 हजार 700 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला असतानाही नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता करीत असल्याचे परिसरात दिसून येत आहेत. क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, विकास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत कर्णे, गणेश साठे, अभिजित सूर्यवंशी, संदीप खरात, अमर शेरे, सचिन बिबवे, उमेश ठोंबरे आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

मुंढवा : सुविधांची हमी मिळेपर्यंत जागा देणार नाही; भीमनगर येथील रहिवाशांची भूमिका

कोल्‍हापूर : बांबवडे येथे बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप; दाम्पत्यासह मुलगी बचावली

ENG vs IRE Test : इंग्लंडने आयर्लंडला चिरडले! 10 विकेट्स राखून दणदणीत विजय

Back to top button