पुण्यातील रिक्षाचालक करणार ‘G-20’ प्रतिनिधींचे अनोखे स्वागत | पुढारी

पुण्यातील रिक्षाचालक करणार ‘G-20’ प्रतिनिधींचे अनोखे स्वागत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील रिक्षाचालक आगळ्या-वेगळ्या पध्दतीने G-20 च्या प्रतिनिधींचे स्वागत करणार आहेत. त्यानुसार शहरातील २० रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांवर ‘G-20’ परिषदेत समाविष्ट असलेल्या २० देशांचे झेंडे असलेले स्टीकर आणि त्यांच्याच राष्ट्रीय भाषेमध्ये ‘पुण्यनगरीत स्वागत आहे’ अशा स्वरूपाचा मजकूर लिहला आहे. त्यामुळे या रिक्षा एक वेगळ्या प्रकारे आपल्या देशातील पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचे दिसत असून सर्वत्र याची जोरदार चर्चा सुरू आहे.

बघतोय रिक्षावाला फोरम रिक्षा संघटनेच्या वतीने ‘G-20’ च्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘G-20’ परिषदेतील २० देशांचे प्रतिनिधी पुण्यात आले आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि पुण्यातील महत्वाची सार्वजनिक वाहतुकीतून त्यांना सेवा देण्याच्या इच्छेने संघटनेच्या वतीने हे एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी संघटनेच्या २० रिक्षांवर स्टीकर आणि त्यांच्याच राष्ट्रीय भाषेत स्वागताचा मजकूर लिहिण्यात आला आहे.

बघतोय रिक्षावाला फोरमतर्फे २० देशांचे झेंडे व त्या देशाच्या राष्ट्रीय भाषेमध्ये त्या देशाच्या ‘प्रतिनिधींचे पुण्यनगरीत स्वागत असो’ असे स्टीकरलावून आम्ही स्वागत करत आहोत. तसेच, आलेल्या पाहुण्यांचे पुण्याचे वाहन म्हणून प्रसिध्द असणार्‍या रिक्षामध्ये पाहुणचार करून पुण्याची उज्वल परंपरा आणि संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवण्यास आमचे रिक्षाचालक तत्पर असतील.

– डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला फोरम

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button