पुणे : प्रेम संबंधातील वादातून प्रेयसीचा केला खून | पुढारी

पुणे : प्रेम संबंधातील वादातून प्रेयसीचा केला खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रेम संबंधातील वादातून प्रेयसीचा केला खून : प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा प्रियकराने पाेटात चाकू भाेकसून खून केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्याचे हद्दीत रविवारी रात्री दहा वाजण्याचे सुमारास सुमारास घडली.

सपना दिलीप पाटील (वय ३२, रा.धनकवडी,पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर राम गिरी (वय ३५,  मु.रा.परभणी) यास पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भारती विद्यापीठ पाेलीसांकडे संजीवनी दत्ता देवकर हिने पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी देवकर आणि सपना पाटील या रिलायन्स मार्टमध्ये हाऊस किंपिंगचे काम करत हाेत्या तसेच धनकवडीतील बालाजीनगर परिसरात राहण्यास आहेत.

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सपना आणि राम गिरी हे दाेघे जेवणाकरिता हाॅटेलमध्ये गेले. जेवण केल्यानंतर ते रात्री दहा वाजण्याचे सुमारास दुचाकीवरुन घरी परतत असताना, पुणेकडून साताराकडे जाणारे नवीन कात्रज बाेगद्याचे सुरुवातीस, काेळेवाडी येथे राम गिरीने गाडी थांबवून सपनाचा निर्घृण खून करून पसार झाला.

खुनाची माहिती मिळताच परिमंडळ दाेनचे पाेलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पाेलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पाेलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांनी घटनास्थळी भेट दिली व आरोपीचा शाेध सुरु केला.

तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आराेपीचा माग काढून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. खुनातील चाकू जप्त करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ पाेलीसांनी दिली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक अशिष कवठेकर करत आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button