पुण्यात राष्ट्रवादीकडून काँग्रेसला धक्के सुरूच | पुढारी

पुण्यात राष्ट्रवादीकडून काँग्रेसला धक्के सुरूच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजपला धक्के देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सह्योगी पक्ष काँग्रेसलाच धक्के देण्याचे काम सुरू आहे. माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक वैजयंती पासलकर व लक्ष्मण आरडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आगामी पालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील मातबरांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सद्या तरी विरोधी पक्ष भाजपऐवजी मित्र पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या मंडळींना गळाला लावण्याचे काम राष्ट्रवादीने सुरू केले असल्याचे आता समोर आले आहे.

शुक्रवारी उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत काँग्रेस जेष्ठ नगरसेवक व माजी महापौर सुरतवाला यांच्यासह माजी नगरसेवक आरडे, पासलकर, राजाभाऊ पासलकर, रमेश भांड आणि सलीम शेख यांनी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, ज्येष्ठ गायक व पक्षाचे नेते आनंद शिंदे, प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.

हे ही वाचलत का :

#26/11 : फ्रंटलाईन वर्करच्या भूमिकेत असणाऱ्या डॉ. सुजाता म्हणजेच मृण्मयी देशपांडेचा अनुभव

Back to top button