कोण होणार करोडपती : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी-लेफ्टनंट कनिका राणे यांची एंट्री | पुढारी

कोण होणार करोडपती : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी-लेफ्टनंट कनिका राणे यांची एंट्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कोण होणार करोडपती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि लेफ्टनंट कनिका राणे यांची एंट्री होणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि लेफ्टनंट कनिका कोण होणार करोडपती मधील कर्मवीर विशेष भागात येणार आहेत.

अधिक वाचा-

मेजर कौस्तुभ राणे यांचं देशसेवेचं व्रत पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी कनिका स्वत: सैन्यात भरती झाल्या. त्या लेफ्टनंट पदावर आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये कनिका आर्मीमध्ये रुजू झाल्या. आता कनिका यांना कौस्तुभ यांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत आणि अनेक वीरपत्नींसाठी काम करायचं आहे.

अधिक वाचा-

Sonali Kulkarni
सोनाली कुलकर्णी-सचिन खेडेकर

जिंकलेले पैसे बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंडला

या शोमध्ये बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंड या संस्थेसाठी त्या खेळायला येणार आहेत. या खेळात त्यांना कुलकर्णी साथ देणार आहे. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांनी तिला पाहिलेलं आहे.

अधिक वाचा- 

कुलकर्णी आणि लेफ्टनंट कनिका मिळून हा ज्ञानाचा खेळ खेळणार आहेत. कनिका यांनी मंचावर कौस्तुभ यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय कसा घेतला, हेही सांगितलं.

या वेळी कनिका यांनी आपल्या कोटला एक पिन लावली होती. सचिन खेडेकरांनी त्याबद्दल तिला विचारलं. त्यावेळी ‘ती मेजर कौस्तुभ यांची पिन असल्याचे सांगितले. त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ती लावली असल्याचं त्यांनी सांगितलं.

या मंचावर जिंकलेले पैसे ते बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंडला देणार आहेत.

पाहा, ‘कोण होणार करोडपती’ – कर्मवीर विशेष भाग २८ ऑगस्ट, शनिवारी रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर.

Back to top button