अलाया एफ हिने केली ‘फ्रेडी’च्या शूटिंगला सुरुवात | पुढारी

अलाया एफ हिने केली 'फ्रेडी'च्या शूटिंगला सुरुवात

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री तब्बू यांच्यासोबतच्या पहिल्या चित्रपट ‘जवानी जानेमन’ मधून अलाया एफ हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री अलाया एफ आता नव्याने ३ चित्रपटाच्या शूंटिंगमध्ये बिझी आहे.

अलायाने चंदिगढमध्ये ‘यूटर्न’ चे जवळपास ४५ दिवसांचे शूंटिग नुकतेच पूर्ण केले आहे. यानंतर तिने मुंबईत येऊन लगेचच ‘फ्रेडी’ चित्रपटाच्या शूंटिगला सुरुवात केली आहे.

अलाया एक साथ ३ चित्रपटात काम करत आहे. यामुळे तिचे शेड्युल बिझी आहे. इतक्या चित्रपटावर काम करत असून, आपल्या आधी केलेल्या ब्रॅंड कॅम्पेनच्या कमिटमेंट्ससाठी देखील आपल्या व्यस्त दिनाक्रमातून वेळ काढत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अलाया सध्या कार्तिक आर्यन, एकता कपूर (फ्रेडी), बालाजी टेलीफिल्म्सद्वारे निर्मित आगामी ‘यूटर्न’ आणि दिग्दर्शक अनुराग बसु यांच्या आगामी चित्रपटात ती दिसणार आहे.

‘जवानी जानेमन’ (२०२०) या चित्रपटातून अलायाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलायाकडे असणाऱ्या चित्रपटामुळे मागील काही महिन्यांपासून २४ तास शूटिंगमध्ये बिझी आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : कला क्षेत्रात अनेक चांगल्या संधी : लेखक अरविंद जगताप

Back to top button