आई कुठे काय करते : अनिरुद्ध सोबत लग्नासाठी संजना झाली उतावीळ; लूक व्हायरल

रुपाली भोसले
रुपाली भोसले
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. संजना- अनिरुध्दच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. संजनाचा लग्नातील लूक व्हायरल झाला आहे.

अधिक वाचा-

अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर तिला वेध लागले ते लग्नाचे. गेली कित्येक वर्ष ती ज्या दिवसाची वाट पहात होती. तो दिवस आता जवळ आलाय. ३० ऑगस्ट ही या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली आहे.

अधिक वाचा-

अनिरुद्धसोबत लगीनगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. लग्नामध्ये नटण्याची सर्व हौस भागवून ती घेणार आहे.

अधिक वाचा-

गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा ब्रायडल लूक सध्या व्हायरल होतोय.

अधिक वाचा-

आई कुठे काय करते मालिकेतल्या तिच्या लूकची नेहमीच चर्चा राहिली आहे. तिचं स्टाइल स्टेटमेंट तिचे चाहते फॉलो करताना दिसतात. हे पात्र साकारणाऱ्या रुपाली भोसलेलादेखील फॅशनचे नवनवे ट्रेंड ट्राय करायला खूप आवडतं.

संजना
संजना

लग्नासाठी खास तयारी

त्यामुळे अनिरुद्धसोबतच्या लग्नासाठी तिने खास तयारी केलीय. गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. अनिरुद्धच्या नावाची मेहेंदीही तिच्या हातावर सजली आहे.

आता या दोघांचं लग्न पार पडणार की इथेही नवा ट्विस्ट येणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल. त्यासाठी न चुकता पाहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार ७.३० वाजता महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news