…धाकधूक… आणि सुटला गट…जल्लोष…! पुणे जिल्हा परिषदेच्या ८२ गटांचे आरक्षण जाहीर!

…धाकधूक… आणि सुटला गट…जल्लोष…! पुणे जिल्हा परिषदेच्या ८२ गटांचे आरक्षण जाहीर!
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : आपल्या गटासाठी काय आरक्षण निघते हे बघण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये सकाळी दहापासूनच इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. प्रत्येकजण टिपण काढत होते, फोनाफोनी सुरू होती. सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यावर अनेकांनी जल्लोष केला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२८) अकरा वाजता आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते. आरक्षण सोडती दरम्यान काही आक्षेप माजी पदाधिकारी आणि सदस्यांनी घेतल्या होत्या. त्यांबाबत अधिकाऱ्यांकडून उत्तरे देण्यात आली. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढताना सभागृहातील अनेकजण आपापली मते मांडत असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पुढील सोडत सुरळीतपणे सुरू झाली. शाळकरी मुलांकडून चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

हरकती नोंदवण्याची संधी

गुरुवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीची सविस्तर यादी शुक्रवारी (दि.२९) अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर या अरक्षणाबाबत काही शंका असल्यास, त्याबाबत येत्या २ ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यलयातील कार्यालयातील निवडणूक शाखेकडे नोंदविता येणार आहेत. प्राप्त हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यानंतर दि. ५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे. आज जाहीर झेलेले आरक्षण खालील प्रमाणे आहे.

खुला संवर्ग (एकूण जागा ४६ पैकी २३ महिला)

खुला (सर्वसाधारण) : १) डिंगोरे-उदापूर (ता. जुन्नर), २) खामगाव – तांबे (ता. जुन्नर), ३) कारेगाव- रांजणगाव गणपती (ता. शिरूर), ४) करंदी-कान्हूर मेसाई (ता. शिरूर), ५) न्हावरा- निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर), ६) वाडा- सातकरस्थळ (ता. खेड), ७) टाकवे बुद्रुक- नाणे (ता. मावळ), ८) माण-कासार अंबोली (ता. मुळशी), ९) वाडेबोल्हाई-कोरेगाव मूळ ( ता. हवेली), १०) खेड शिवापूर- खानापूर (ता. खेड)
११) राहू-खामगाव (ता. दौंड), १२) गोपाळवाडी-कानगाव (ता. दौंड), १३) लिंगाळी-देऊळगावराजे (ता. दौंड), १४) पाटस-कुरकुंभ (ता. दौंड), १५) वरवंड-बोरीपार्धी (ता. दौंड), १६) पिसर्वे- माळशिरस (ता. पुरंदर), १७) मांडकी-परिंचे (ता. पुरंदर), १८) वेल्हे बुद्रुक- वांगणी (ता. वेल्हे), १९) भोंगवली- संगमनेर (ता. भोर), २०) भोलावडे- शिंद (ता. भोर), २१) कारी-ऊत्रोली (ता. भोर), २२) निमगाव केतकी- शेळगाव (ता. इंदापूर), २३) बावडा-लुमेवाडी (ता. इंदापूर).

खुला संवर्ग (महिला)

१) ढालेवाडी तर्फे हवेली – सावरगाव (ता. जुन्नर), २) राजुरी-बेल्हे (ता. जुन्नर), ३) शिनोली-बोरघर (ता. आंबेगाव), ४) घोडेगाव- पेठ (ता. आंबेगाव), ५) कडूस – शिरोली (ता. खेड), ६) पाईट – पिंपरी बुद्रुक (ता. खेड), ७) कुरवंडे – कार्ला (ता. मावळ), ८) ऊरळीकांचन- सोरतापवाडी (ता. हवेली), ९) कदमवाकवस्ती – थेऊर (ता. हवेली), १०) कोळविहीरे – बेलसर (ता. पुरंदर), ११) मोरगाव- मुढाळे (ता. बारामती), १२) सणसर- बेलवडी (ता. इंदापूर), १३) पाडळी-येणेरे (ता. जुन्नर), १४) कुसगाव बुद्रुक-सोमाटणे (ता. मावळ), १५) चांदखेड-काले ( ता. मावळ), १६) हिंजवडी – कासारसाई (ता. मुळशी), १७) भिगवण- शेटफळगढे (ता. इंदापूर), १८) सणसवाडी- कोरेगाव भीमा (ता. शिरूर), १९) रेटवडी- कन्हेरसर (ता. खेड), २०) गराडे – दिवे (ता. पुरंदर), २१) पिंपळगाव तर्फे खेड -काळूस (ता. खेड)
२२) नीरा शिवतक्रार – वाल्हे (ता. पुरंदर), २३) पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक – जारकरवाडी (ता. आंबेगाव).

अनुसूचित जाती (एकूण जागा आठ पैकी चार महिला)

अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : १) खडकाळे-वराळे (ता. मावळ), २) वडगाव निंबाळकर – सांगवी बुद्रुक (ता.बारामती), ३) वडापुरी-माळवाडी (ता. इंदापूर), ४) काटी- वरकुटे खुर्द (ता. इंदापूर).

अनुसूचित जाती (महिला) : १) नीरावागज-डोर्लेवाडी (ता. बारामती), २) खडकी-राजेगाव (ता. दौंड), ३) गुणवडी-पणदरे (ता. बारामती)
४) पारगाव-पिंपळगाव (ता. दौंड).

अनुसुचित जमाती (एकूण जागा सहा पैकी तीन महिला)

अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : १) अवसरी बुद्रुक – पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे (ता. आंबेगाव), २) शिरूर ग्रामीण- निमोणे (ता. शिरूर)
३) वडगाव रासाई- मांडवगण फराटा (ता. शिरूर)

अनुसूचित जमाती (महिला) : १) कळंब-चांडोली बुद्रूक(ता. आंबेगाव), २) बोरी बुद्रुक-खोडद (ता. जुन्नर), ३) आळे-पिंपळवंडी (ता. जुन्नर)

नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीस – (एकूण जागा २२ पैकी ११ महिला)

नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : १) नारायणगाव- वारुळवाडी (ता. जुन्नर), २) टाकळी हाजी- कवठे येमाई (ता. शिरूर)
३) तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर (ता. शिरूर), ४) म्हाळुंगे- आंबेठाण (ता. खेड), ५) इंदोरी-तळेगाव दाभाडे ग्रामीण (ता. मावळ), ६) विंझर-पानशेत (ता. वेल्हे), ७) वेळू-नसरापूर (ता. भोर), ८) काटेवाडी- शिर्सूफळ (ता. बारामती), ९) निंबूत-वाघळवाडी (ता. बारामती), १०) लासुर्णे-वालचंदनगर (ता. इंदापूर), ११) ओतूर – उंब्रज (ता. जुन्नर)

नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला (ओबीसी महिला) : १) अंथुर्णे-बोरी (ता. इंदापूर), २) कोळवण-माले (ता. मुळशी), ३) नायफड- अवदर (ता. खेड), ४) पळसदेव- बिजवडी (ता. इंदापूर), ५) कुरुळी-मरकळ (ता. खेड), ६) नाणेकरवाडी- मेदनकरवाडी (ता.खेड), ७) यवत-बोरीभडक (ता. दौंड), ८) सुपा-काऱ्हाटी (ता. बारामती), ९) पिरंगुट-भुगाव (ता. मुळशी), १०) लोणीकाळभोर -कुंजीरवाडी (ता. हवेली), ११) पेरणे- लोणीकंद (ता. हवेली).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news