पुणे : खेडला अनेकांच्या स्वप्नावर पाणी! पंचायत समिती आरक्षण सोडतीकडे नागरिकांनी फिरवली पाठ | पुढारी

पुणे : खेडला अनेकांच्या स्वप्नावर पाणी! पंचायत समिती आरक्षण सोडतीकडे नागरिकांनी फिरवली पाठ

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा : खेड पंचायत समितीचे आरक्षण सोडत गुरुवारी (दि २८) राजगुरूनगर येथील चंद्रमा गार्डन कार्यालयात पार पडली. प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी ही सोडत जाहीर केली. सोडतीत अनेक सर्वसाधारण इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.तर यापूर्वी कधीच आरक्षण न मिळालेल्या गणात संधी आल्याने अशा इच्छुकांच्या मन्सुब्याना पालवी फुटणार असल्याचे मानले जात आहे.

शिक्षक भरती महाघोटाळा : अभिनेत्री अर्पिताच्‍या फ्‍लॅटमधून आणखी २७ कोटींची रोकड, ४ कोटींचे सोने जप्‍त

नव्यानेसकाळी ११ वाजता सोडतीसाठी अधिकारी उपस्थित होते. मात्र एकही नागरिक उपस्थित नसल्याने अर्धा तास उशिरा सोडत सुरू केली. तरीही चार-सहा जण,पत्रकार आणि चिठ्ठी काढायला आलेल्या विद्यार्थ्या शिवाय कार्यालयात कोणी नव्हते. आरक्षण सोडतीच्या अखेरीस १५ ते वीस जण हजर झाले होते. कोणत्याही आरक्षणावर हरकत,आक्षेप घेतला गेला नाही. सोशल मीडियावर हे आरक्षण मात्र प्रचंड व्हायरल करण्यात आले.

राज्‍यसभेत गदारोळ : आणखी तीन खासदार निलंबित

सोडती प्रसंगी रिकामे असलेले कार्यालय.

सोडतीनुसार जाहीर करण्यात आरक्षण पुढीलप्रमाणे:- अनुसुचित जाती – शिरोली (महिला राखीव). अनुसुचित जमाती – मरकळ ( महिला राखीव). म्हाळुंगे.नागरिकांचा मागास वर्ग – आंबेठाण ( महिला राखीव) पाईट. सर्वसाधारण गण ::- वाडा, पिंपरी, कनेरसर, कुरुळी, नाणेकरवाडी, काळूस – (महिला राखीव). नायफड, औदर, सातकरस्थळ, रेटवडी, पिंपळगाव, कडूस, मेदनकरवाडी. सातकरस्थळ शाळेतील विद्यार्थ्यांनी आरक्षित होणाऱ्या चिठ्ठी काढल्या.अजय चव्हाण, कैलास मुसळे,संतोष गारडी, किशोर बागलाने, सचिन सातकर, देवराम वाडेकर, दिलीप ढेरंगे,आनंद गावडे,वैभव गावडे आदी यावेळी उपस्थित होते.

नागपूर हादरले! ११ वर्षीय मुलीवर ९ जणांचा सामूहिक बलात्कार, पैशांचे आमिष दाखवून केलं कृत्य

Back to top button