राज्‍यसभेत गदारोळ : आणखी तीन खासदार निलंबित | पुढारी

राज्‍यसभेत गदारोळ : आणखी तीन खासदार निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्‍यसभेत विराेधी पक्षांच्‍या सदस्‍यांचा गदारोळ आणि निलंबनाचे सत्र आजही (दि. २८ ) कायम राहिले. आज तीन खासदारांना निलंबित करण्‍यात आले. पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत गदारोळ प्रकरणी २७ खासदारांना निलंबित करण्‍यात आले असून, यामध्‍ये राज्‍यसभेतील २३ आणि लोकसभेतील ४ खासदारांचा समावेश आहे.

आज राज्‍यसभेत कामकाज सुरु होताच महागाईसह विविध मुद्‍यांवर विरोधी पक्षाचे सदस्‍य आक्रमक झाले. गदारोळामुळे आम आदमी पार्टीचे खासदार सुशील गुप्‍ता, संदीप पाठक, अपक्ष खासदार अजित कुमार भुइयां यांना एक आठवड्यासाठी निलंबित करण्‍यात आले आहे. सभागृहाच्‍या कामकाजात व्‍यत्‍यय आणल्‍याप्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. यंदा पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्‍यात आलेल्‍या खासदारांची संख्‍या २७ झाली आहे.

 

 

Back to top button