पुणे : त्याने चक्क मेव्हण्याच्या घरी फ्रीजखाली लपवलेले होते 60 तोळ्यांचे दागिने! | पुढारी

पुणे : त्याने चक्क मेव्हण्याच्या घरी फ्रीजखाली लपवलेले होते 60 तोळ्यांचे दागिने!

पुणे / बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील एका व्यवसायिकाच्या घरातून तब्बल 30 लाख रूपयांच्या 60 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या मुख्य आरोपीकडे तपास करून बिबवेवाडी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून, मुख्य आरोपीच्या मेव्हण्याच्या घरातील फ्रिजखाली लपविलेले हे 60 तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अखिलेश यादवांना नुपूर शर्मांवरील टिव्ट पडणार महागात, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

जुनेद रिझवान सैफ (29, रा. ग्रीनपार्क, शेरखान चाळ, कोंढवा) आणि हैदर कल्लु शेख (31, रा. वसवाडी, राजेशिवाजीनगर, पाखर सांगवी, बार्शी रोड, लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी मुख्य आरोपी मुश्तफा उर्फ बोना उर्फ पाटी शकिल अन्सारी (वय.34,रा. ग्रीन पार्क शेजारी सर्वे नं.42, कोंढवा) अटक करण्यात आली होती. अन्सारी हा रेकॉर्डवरील सराईत चोरटा असून त्याच्यावर चोरीचे 10 गुन्हे दाखल आहेत.

व्हीप मोडणाऱ्यांविरोधात कारवाई होणार : आदित्य ठाकरे

ही घटना दहा दिवसांपूर्वी सवेरा अपार्टमेंट डी विंग बिबवेवाडी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी प्रविण रमेश कांडपिळे (वय.48,रा. सवेरा अपार्टमेंट) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले

याप्रकरणी अन्सारी याच्याकडे तपास करत असताना त्याने नातेवाईकांकडे हे दागिने लपविल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर अन्सारीच्या कोंढवा येथे राहणार्‍या त्याचा बहिणीच्या पतीकडे (मेव्हणे) चौकशी करत असताना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच जुनेदने त्याच्या घरातील फ्रिजखाली दागिने लपविल्याचे सांगितले. वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, संतोष जाधव, सतिश मोरे, तानाजी सागर, राहुल शेलार, अतुल महांगडे यांनी ही कामगिरी केली.

इकडे शिंदेंनी बहुमत जिंकलं तिकडे ठाकरे ॲक्शन मोडमध्ये! शिवसेना भवनमध्ये बैठकीसाठी दाखल

अन्सारी हा घरफोडी करण्यात तरबेज आहे. तो टेरेसवरून तो खाली गॅलरीत उतरून किंवा घराचा पाठीमीगल दरवाजा खिडकी तोडून आत प्रवेश करून चोरी करण्यात पटाईत होता. ह्या गुन्ह्यातही त्याने अशाच पध्दतीने चोरी केली होती. गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या मेव्हण्याला व त्याचा साथीदार हैदर याला तांत्रिक तपासाच्या आधारे अटक करण्यात आली आहे.

                                            – विलास सोंडे, वरिष्ठ निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस ठाणे.

अशा पद्धतीने परत याल, असे वाटले नव्हते: बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांना टोला

Back to top button