पिस्तूल बाळगणार्‍या सराइताला अटक

पिस्तूल बाळगणार्‍या सराइताला अटक
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अवैधरीत्या पिस्तूल जवळ बाळगणार्‍या सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथक एकच्या कर्मचार्‍यांनी अटक केली. वारजे परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली.शेंडगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण, जबरी चोरी, असे गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण येडबा शेंडगे (म्हाडा कॉलनी, वारजे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खंडणीविरोधी पथकाचे कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत होते.

या दरम्यान वारजे पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार म्हाडा कॉलनी परिसरात पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. सहायक निरीक्षक अभिजित पाटील यांच्या पथकाने सापळा रचून शेंडगेला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात एक पिस्तूल व दोन काडतुसे सापडली. पिस्तुलाबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता, स्व-संरक्षणार्थ पिस्तूल बाळगत असल्याचे उत्तर त्याने दिले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news