रेल्वेची 1949 जणांना ‘संजीवनी’; धावत्या रेल्वेत उपचार आणि महिलांची प्रसूतीही

रेल्वेची 1949 जणांना ‘संजीवनी’; धावत्या रेल्वेत उपचार आणि महिलांची प्रसूतीही
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोणत्या महिलेची धावत्या रेल्वेत प्रसूती केली, कोणाच्या जखमांवर उपचार केले, तर कोणाला आलेल्या हृदयविकारावर तातडीचे उपचार करून प्राण वाचविले, फिट येणे, चक्कर आणि किरकोळ आजारांवरील उपचारांची तर गणतीच नाही. यांसारख्या विविध आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेल्या 1 हजार 949 रेल्वे प्रवाशांवर रेल्वेकडून उपचार करण्यात आले आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासादरम्यान प्रवाशांना येणार्‍या आरोग्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी एक वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोफत इमर्जन्सी सेवा पुरविण्याचे काम करण्यात येते.

पथकाच्या महिला डॉक्टर माया रोकडे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, 'खास करून रात्रीच्या वेळी एखादा कॉल आला, तर खूप अवघड जाते. काही रुग्ण खूपच अत्यवस्थ स्थितीत असतात. त्या वेळी न डगमगता रात्री मिळेल त्याची मदत घेत अथक प्रयत्न करून उपचार करावे लागतात. पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस, आरपीएफ आणि रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांची आम्हाला या कामात मोठी मदत होते. आमच्या पथकात दोन नर्स आहेत.' पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासादरम्यान प्रवाशांना येणार्‍या आरोग्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी एक वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

त्याद्वारे रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोफत इमर्जन्सी सेवा पुरविण्याचे काम करण्यात येते. पथकाच्या महिला डॉक्टर माया रोकडे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, 'खास करून रात्रीच्या वेळी एखादा कॉल आला, तर खूप अवघड जाते. काही रुग्ण खूपच अत्यवस्थ स्थितीत असतात. त्या वेळी न डगमगता रात्री मिळेल त्याची मदत घेत अथक प्रयत्न करून उपचार करावे लागतात. पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस, आरपीएफ आणि रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांची आम्हाला या कामात मोठी मदत होते. आमच्या पथकात दोन नर्स आहेत.'

पुणे रेल्वे स्थानकावर रोज 30 जणांवर उपचार
'पुणे स्थानकावर रोज 30 रेल्वेप्रवाशांवर आम्हाला उपचार करावे लागतात. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना आरोग्याच्या समस्या येतात,' असेही डॉ. रोकडे म्हणाल्या.

एप्रिल 2021 102
मे 2021 139
जून 2021 145
जुलै 2021 160
ऑगस्ट 2021 178
सप्टेंबर 2021 110
ऑक्टोबर 2021 156
नोव्हेंबर 2021 139
डिसेंबर 2021 135
जानेवारी 2022 120
फेब—ुवारी 2022 122
मार्च 2022 150
एप्रिल 2022 130
मे 2022 163
एकूण 1 हजार 656

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news