पुणे-भुसावळ एक्स्प्रेस सेवा पूर्ववत; 10 जुलैपासून रोज 11.40 ला सुटणार | पुढारी

पुणे-भुसावळ एक्स्प्रेस सेवा पूर्ववत; 10 जुलैपासून रोज 11.40 ला सुटणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: रेल्वे प्रशासनाने पुणे- भुसावळ एक्स्प्रेसदरम्यान धावणार्‍या गाडीची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही गाडी पुणे येथून 10 जुलैपासून दररोज सकाळी 11.40 वाजता सुटेल आणि रात्री 10.00 वाजता भुसावळ येथे पोहोचेल, तर 11 जुलैपासून दररोज ही गाडी रात्री 12.35 वाजता भुसावळ येथून सुटेल अन् दुपारी 12.05 वाजता पुण्याला पोहोचेल.

दरम्यान, ही गाडी चिंचवड, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा आणि जळगाव स्थानकांवर थांबा घेईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा

‘स्पेशल छब्बीस’चा डाव फसला; प्राप्तिकर अधिकारी असल्याचा बनाव उघड

कराडातील मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी

कोकण : पक्षांतरावेळीच दीपक केसरकरांची सुरक्षा धोक्यात कशी येते?

Back to top button