‘सातबारा’वर मोबाईल नंबरही; सातबारा धारकांशी संपर्क करणे होणार सोपे | पुढारी

‘सातबारा’वर मोबाईल नंबरही; सातबारा धारकांशी संपर्क करणे होणार सोपे

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यातील सर्व प्रकारच्या सातबाराधारकांच्या ‘सातबारा’वर मोबाईल क्रमांकासह ई-मेलची नोंदणी करण्यात येणार आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या वेळी होणार्‍या गैरव्यवहारास आळा बसणार आहे. संबंधित मालमत्तेवर बँकेच्या कर्जाचा बोजा आहे की नाही, याची माहिती मिळणार असून, संबंधित सातबाराधारकास तलाठी अथवा अधिकार्‍यांना संपर्क साधणे सोपे होणार आहे. राज्यात सुमारे 2 कोटी 56 लाख सातबारा उतारे आहेत. हे सर्व सातबारा ऑनलाइन करण्यात आले आहेत. या सातबार्‍यांवर कोड नंबर, तसेच डिजिटल स्वाक्षरी सही करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सातबारे विविध शासकीय कामांसाठी आवश्यक बनले आहेत.

असे असले तरी मागील काही वर्षांपासून जमीन खरेदी-विक्री करताना जमिनीबाबत गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला गेल्याच्या बाबीही उघडकीस आल्या आहेत. याबरोबरच जमिनीवर एखाद्या बँकेचा बोजा असल्यास त्याची माहिती जमीन-विक्रीच्या वेळी समजावी, तसेच अधिकारी अथवा तलाठ्यांना एखाद्या महसूल विभागातील अधिकार्‍यांनी संबंधित सातबाराधारकास संपर्क साधावयाचा असेल, तर सातबार्‍यावर असलेल्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेलवर संपर्क साधणे सोपे जाणार आहे, तसेच गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे.

शहरी अथवा ग्रामीण भागात नागरिकांच्या सातबारा उतार्‍यावर मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल नोंदण्यात येणार आहेत. यामुळे जमिनीच्या गैरव्यवहारास आळा बसणार आहे.

                                    – सरिता नरके, समन्वयक, ई-महाभूमी

हेही वाचा

पुणे-भुसावळ एक्स्प्रेस सेवा पूर्ववत; 10 जुलैपासून रोज 11.40 ला सुटणार

सातारा : भात लागण रखडल्याने यंदा उत्पादन घटण्याची भीती

‘स्पेशल छब्बीस’चा डाव फसला; प्राप्तिकर अधिकारी असल्याचा बनाव उघड

Back to top button