खडकी रुग्णालयातील डॉक्टरच ‘लेट लतिफ’ | पुढारी

खडकी रुग्णालयातील डॉक्टरच ‘लेट लतिफ’

खडकी : पुढारी वृत्तसेवा: खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांमधील अनेक डॉक्टर ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येतात अन लवकर घरी निघून जातात. त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. बोर्डाच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयामधील अनेक डॉक्टर वेळेपेक्षा उशिरा येत असल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. डॉक्टर उशिरा येत असल्याने तपासणीसाठी रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे, रुग्णालयामध्ये मेडिसिन, त्वचा रोग, शस्त्रक्रिया, दंतरोग, स्त्रीरोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा, मलमपट्टी आदि विभागास डॉक्टर उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, अनेक डॉक्टर वेळेपेक्षा उशिरा येत असल्याने रुग्णांना ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नसल्याने ते हतबल झाले आहेत.

ओपीडीत होतोय उशीर
डॉ. आंबेडकर रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची वेळ सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत असून केस पेपरची वेळ 8.30 ते 12.30 पर्यंतची आहे. रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टर सकाळी साडेनऊ वाजता येतात. ओपीडी (बाह्य रुग्ण तपासणी) विभागामध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे.

उपाध्यक्षांचीच कबुली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी बोर्डाच्या बैठकीत स्पष्ट केले. अनेक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने ऑपरेशनदेखील वेळेवर होत नसल्याचे भापकर म्हणाले. डॉक्टर वेळेमध्ये उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

रुग्णालयात 22 तज्ज्ञ स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. अनेक डॉक्टर गैरहजर राहतात. काही डॉक्टरांनी काम सोडले आहे. काही डॉक्टर सकाळीच फोन करून येणार नसल्याचे सांगतात, त्यामुळे अनेक रुग्ण रुग्णालयात थांबून परत जातात.

                                            डॉ. रणजित भोसले, निवासी वैद्यकीय अधिकारी

हेही वाचा

जालना : वाढोना शाळेचे पत्रे उडाली; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शाळा भरतेय मंदिरात !

जालना : सापडलेला मोबाईल केला परत

वादळातही शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य परभणी

 

Back to top button