माळेगाव कारखाना येथील बंद रस्ता खुला करा | पुढारी

माळेगाव कारखाना येथील बंद रस्ता खुला करा

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा: माळेगाव कारखाना (ता. बारामती) येथील प्रभाग क्रमांक 15 वाघमोडे वस्तीमधील रस्ता एका बाजूने परिसरातील काही व्यक्तींनी तार कंपाउंड टाकून बंद केला आहे, त्यामुळे लोकांची अडचण होत असून सदरचा रस्ता तातडीने खुला करून संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित मागणीचा तक्रार अर्ज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी बारामती यांना दिला आहे.

  • अर्जावर गणेश कोकरे, सलीम पठाण, शिवाजी कोकरे, अतुल वाघमोडे, शुभम जगदाळे आदींच्या सह्या आहेत. माळेगाव कारखान्यावरील प्रभाग क्रमांक 15 मधील वाघमोडे वस्तीमधील रस्ता काही दिवसांपासून किरण गव्हाणे, संतोष मुळीक, राजेंद्र मुळीक, शंकर मुळीक आदींनी एका बाजूला तार कंपाउंड टाकून बंद केला आहे. परिणामी रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या रहिवाशांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. सदर रस्ता सन 2015 ते 2019 दरम्यान बांधकाम विभागांतर्गत मागासवर्गीय वस्तीत रस्ता बांधकाम वीस टक्के निधीमधून तयार केला आहे. मात्र तरीही दहशतीच्या जोरावर रस्ता बंद केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

ज्या रस्त्यांवर शासनाच्या संबंधित विभागाकडून निधी आला आहे असे रस्ते नागरी सुविधाअंतर्गत येत असल्याने अडवले जाऊ शकत नाहीत.

                                              – रामभाऊ वाघमोडे, ग्रामस्थ.

संबंधित रस्ता आमच्या मालकी हद्दीतून गेला आहे. सदर जागेचा आमच्याकडे शासकीय दस्तऐवज असून आम्ही आमच्या हद्दीत दीड फूट जागा सोडून तार कंपाउंड केले आहे.

                                                    – किरण बाळू गव्हाणे, ग्रामस्थ.

हेही वाचा

नाशिक : दागिने चोरून विवाहिता दुसर्‍याच व्यक्तीसोबत झाली पसार

औरंगाबाद: जिल्ह्यावर पाऊस रुसला

येथे कर माझे जुळती; पाचाड येथील राजमाता जिजामाता राजवाडा आणि समाधीस्थळ

Back to top button