औरंगाबाद: जिल्ह्यावर पाऊस रुसला
औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची पिछाडी असून, गेल्या वर्षी 23 जून रोजी जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल 144.4 मिमी (140.6 टक्के) पाऊस बरसला होता. दरम्यान बुधवारी रात्री जिल्ह्यात 19.3 मिलिमीटर पाऊस झाला असून यामध्ये सर्वाधिक 34.7 मिमी पाऊस गंगापूर तालुक्यात झाला.
यामध्ये औरंगाबाद तालुक्यात 14.1 मिमी, पैठण 14.7, वैजापूर 26.6, कन्नड 12.9, खुलताबाद 16.7, सिल्लोड 8.7, सोयगाव 25.3 व फुलंब—ी तालुक्यात 22.5 मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात सुरुवातीपासून पावसाचा जोर होता, यंदा मात्र अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, यामुळे खरिपाच्या पेरण्याही रखडल्या असून जिल्ह्यात केवळ 6 टक्के पेरण्या झाल्या आहेत, पावसासंदर्भातील हवामान विभागाचे अंदाजही बहुतांश फोल ठरले आहेत.
आताही हवामान विभागाने येत्या आठ दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे सातत्य राहणार असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 तालुक्यांपैकी गंगापूर, पैठण आणि वैजापूर तालुक्यामध्ये अपेक्षित पावसापेक्षा अधिक पाऊस झाला आहे, मात्र उर्वरित तालुक्यात पावसाची पिछाडी आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी 679.5 मिमी पाऊस पडणे अपेक्षित असून, त्या तुलनेत आतापर्यंत 12.9 मिमी पाऊस झाला आहे.
गेल्यावर्षीचा ‘अपेक्षित’च्या तुलनेत झालेला पाऊस
तालुका 23 जून 2022 पर्यंत 23 जून 2021 पर्यंत
- औरंगाबाद 61.1 टक्के 107.9 टक्के
- पैठण 105.6 टक्के 87.3 टक्के
- गंगापूर 111.8 टक्के 95.4 टक्के
- वैजापूर 110.7 टक्के 103.9 टक्के
- कन्नड 88.4 टक्के 94.4 टक्के
- खुलताबाद 84.9 टक्के 73.4 टक्के
- सिल्लोड 58.3 टक्के 111.5 टक्के
- सोयगाव 66.4 टक्के 91.8 टक्के
- फुलंब—ी 66.6 टक्के 116.9 टक्क