नाशिक : दागिने चोरून विवाहिता दुसर्‍याच व्यक्तीसोबत झाली पसार | पुढारी

नाशिक : दागिने चोरून विवाहिता दुसर्‍याच व्यक्तीसोबत झाली पसार

नाशिक : घरातील सोन्याचे दागिने व रोकड चोरून एक विवाहिता दुसर्‍या व्यक्तीसोबत पसार झाल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणी एकाने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विवाहितेसह सागर आत्माराम ढेमसे (रा. नाशिक) याच्याविरोधात चोरी, फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या भावाच्या पत्नीने जून महिन्यात घरातून 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेत सागर ढेमसेसोबत पसार झाली.

हेही वाचा :

Back to top button