सोसायट्यांत आमदार निधीतून कामे, सरकारचा निर्णय; रस्ते, पेव्हिंग ब्लॉकसह नऊ कामांचा समावेश

सोसायट्यांत आमदार निधीतून कामे, सरकारचा निर्णय; रस्ते, पेव्हिंग ब्लॉकसह नऊ कामांचा समावेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा:  शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आता आमदार निधीतून विकासकामे करता येणार आहेत. एका सोसायटीमध्ये 50 लाखांपर्यंतची विकासकामे करता येणार असून, त्यामध्ये रस्ते, व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, पेव्हिंग ब्लॉक, सीसीटीव्ही कॅमेरे अशा विविध कामांचा समावेश आहे. नगरविकास खात्याने यासंबंधीचे आदेश गुरूवारी काढले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी यासंबंधीची मागणी केली होती. यापुर्वी आमदार निधीतून, तसेच महापालिकेकडूनही सहकारी सोसायट्यांमध्ये विकासकामे करता येत नव्हती.

त्यात अनेक सोसायट्यांमधील नागरी समस्या सोडविण्यास मर्यादा येत होती. या निर्णयाने मात्र सोसायटीधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या कामांसाठी शासनाने काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. त्यानुसार एका आमदाराला एका वर्षात अडीच कोटींची विकासकामे सोसायट्यांमध्ये करता येणार आहेत. संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्थेंतर्गत झालेली असणे बंधनकारक आहे. या सोसायटीला महापालिकेची मंजुरी असणे आवश्यक आहे. दरम्यान, संबंधित विकासकामाच्या 75 टक्के इतकी रक्कम आमदार निधीतून, तर उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधित सोसायटीला खर्च करावी लागणार आहे.

सोसायट्यांमध्ये करता येणारी विकासकामे
रस्त्यांचे डांबरीकरण करणे
पेव्हिंग ब्लॉक बसविणे
परिसरात जॉगिग ट्रॅक विकसित करणे
व्यायामशाळा अथवा छोटे मैदान करणे
परिसरात छोटे उद्यान आणि ट्री गार्ड बसविणे
सीसीटीव्ही कॅमेरे आणि अग्निशमन यंत्रणा बसविणे
इलेट्रिक्ल व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणे
इमारतीवर सोलर यंत्रणा बसविणे
सांडपाणी प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणे
आवारात कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणे
रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारणे
सौर दिवे बसविणे

शहरी भागातील मोठ्या सोसायट्यांमध्ये काही हजार नागरिक राहात असतात. त्यात प्रामुख्याने सोसायट्यांतील रहिवाशांना फ्लॅटचे हप्ते, मिळकतकर, मेंटेनन्स या खर्चाचा भार सहन करावा लागत असल्याने सोसायट्यातील अंतर्गत विकासकामे करण्यास अडचण येत होती. आता मात्र हा प्रश्न सुटणार आहे.
                                                             -सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news