अकोला : बैलगाडीसह शेतकरी दाम्पत्य पुरात गेले वाहून; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर | पुढारी

अकोला : बैलगाडीसह शेतकरी दाम्पत्य पुरात गेले वाहून; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

अकोला; पुढारी वृत्तसेवा : वडगाव येथील मोहाडी नदीला आलेल्या पुरात बैलगाडीसह शेतकरी दाम्पत्य वाहून गेल्याची घटना गुरुवारी (दि.२४) सायंकाळी घडली. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात ही घटना घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मौजे वडगाव गड येथील मोहाडी नदीला पूर आला. पुराच्या पाण्यातून बैलगाडीने वाट काढत असताना काशीराम गोविंदा सोनोने व त्यांची पत्नी इंदूबाई काशीराम सोनोने हे दोघेही बैलगाडीसह प्रवाहात वाहत गेले. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागासह परिसरातील ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली. वडगाव गड, हाशमपूर येथील नागरिकांना काशीराम सोनोने व एक बैल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. इंदूबाई सोनोने व अन्य एक बैल मोहिदेपूर- इस्लामपूर मार्गावर पाण्यात मृतावस्थेत आढळून आले. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button