पिंपरी : उमा खापरे पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या महिला आमदार | पुढारी

पिंपरी : उमा खापरे पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या महिला आमदार

पिंपरी वृत्तसेवा: भाजपचा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा तथा माजी नगरसेविका उमा खापरे या पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. शहरात आता भाजपच्या आमदारांची संख्या तीन झाली आहे. या निवडीमुळे शहर भाजपकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. विधान परिषदेवर त्यांची सोमवारी (दि.20) निवड झाली.

त्यामुळे त्या शहरातील पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. शहरातील चौथ्या आमदार तर, भाजपच्या तिसर्‍या आमदार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आ. खापरे यांच्यामुळे शहर भाजपची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्या पालिकेत 10 वर्षे नगरसेविका होत्या. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले.

पिंपरी : 18 दिवसांत आढळले 176 संशयित; 6 जणांना बाधा

भाजप प्रदेश व जिल्हा पातळीवर विविध पदांवर त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. सध्या त्या भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आहेत. त्या गोपीनाथ मुंडे गटाच्या समर्थक मानल्या जातात. त्या आमदार झाल्याची बातमी धडकताच चिंचवड येथील त्यांच्या निवासस्थानी समर्थक व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आ. जगताप आणि टिळक यांचा हा विजय
विधान परिषदेत झालेला माझा विजय हा लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या उमा खापरे यांनी दिली. त्या म्हणाल्या, भारतीय जनता पक्षात खर्‍या कार्यकर्त्याला सन्मान मिळतो, हे भाजपने मला विधान परिषदेवर संधी देऊन दाखवून दिले आहे. माझा विजय हा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याचा व स्त्रीशक्तीचा विजय आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांचे मी आभार मानते.

हेही वाचा

शिवाजी विद्यापीठात उद्या न्यूज अँकरिंग कार्यशाळा

कोल्हापूर : पगारासाठी गुरुजींचे आंदोलन

सांगली : खूनप्रकरणी दाम्पत्यास जन्मठेप

Back to top button