शिवाजी विद्यापीठात उद्या न्यूज अँकरिंग कार्यशाळा | पुढारी

शिवाजी विद्यापीठात उद्या न्यूज अँकरिंग कार्यशाळा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन व शहीद वीर माता महाविवद्यालय, टिटवे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. 22) रोजी न्यूज अँकरिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत एस. न्यूज वृत्तवाहिनीचे प्रोग्रामिंग कॉर्डिनेटर चेतन मिठारी व न्यूज अँकर पल्लवी गोखले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या नवीन इमारतीमध्ये कार्यशाळा होईल. दुपारी 12 ते 3 वेळेत होणार्‍या कार्यशाळेत न्यूज अँकरिंगचा डेमो होणार आहे. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी हीींिीं://षेीाी.सश्रश/6छऊेूींगळऊउणाथटलऋ8 या लिंकवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेमध्ये विद्यार्थी, पत्रकार व डिजिटल मीडियात करिअर करू इच्छिणार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.

Back to top button