पानशेत-कुरण खुर्दला चार वर्षांनंतर मिळाला कारभारी; सरपंचपदी सिद्धांत गायकवाड

पानशेत-कुरण खुर्दला चार वर्षांनंतर मिळाला कारभारी; सरपंचपदी सिद्धांत गायकवाड

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयापासून थेट उच्च न्यायालयापर्यंतच्या वादात चार वर्षांपासून अडकलेल्या कुरण खुर्द-पानशेत ग्रामपंचायतीला अखेर कारभारी मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच जाहीर केली असून सरपंचपदी सिद्धांत चंद्रकांत गायकवाड यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे.

दि. 8 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत गायकवाड यांची थेट जनतेतून बिनविरोध निवड करण्यात आली होती. माजी सरपंच रवींद्र कांबळे यांनी त्यांच्या निवडीला हरकत घेतली होती. त्यामुळे गायकवाड यांच्या निवडीला स्थगिती देण्यात आली होती. त्यांच्या निवडीची घोषणा निवडणूक विभागाने केली नाही. त्या विरोधात गायकवाड यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने गायकवाड यांची निवड जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नुकतीच जिल्हाधिकार्‍यांनी गायकवाड यांची निवड जाहीर केली. या आधी 2018 च्या कुरण खुर्दच्या सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत रवींद्र कांबळे हे विजयी झाले होते. सरपंच कांबळे यांचे पानशेत येथील पाटबंधारे खात्याच्या जागेत अतिक्रमणे असल्याने त्यांची निवड रद्द करण्याची मागणी माजी सरपंच सुनील गायकवाड यांनी केली होती.

त्यानंतर चौकशी करून विभागीय आयुक्तांनी कांबळे यांची सरपंचपदाची निवड रद्द केली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी डिसेंबर 2019 मध्ये निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी सिंद्धात चंद्रकांत गायकवाड तसेच त्याचे चुलते व चुलती असे तिघांनी अर्ज दाखल केले होते. चुलती, चुलत्याने अर्ज मागे घेतल्याने गायकवाड याची बिनविरोध निवड झाली होती.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news