नाशिप्र पतसंस्थेचे ५० वर्षातील काम कौतुकास्पद : डॉ. कलाल | पुढारी

नाशिप्र पतसंस्थेचे ५० वर्षातील काम कौतुकास्पद : डॉ. कलाल

नाशिक (सिडको)  : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेने ५० वर्षात केलेले काम कौतुकास्पद आहे. पतसंस्थेने सेवा निवृत्त सभासंदाच्या  ठेवी घेऊन त्यांना सहभागी करून घेतले पाहिजे असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे माजी उपायुक्त व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी सेवानिवृत्त सभासद कार्यक्रम प्रसंगी डॉ. कलाल बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्थेचे संस्थापक सदस्य ज. ग. मेतकर उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर सस्थेचे सेक्रटरी अश्विनीकुमार येवला, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत देशपांडे, पतसंस्थेचे मानद चिटणीस राजेंद्र गायवन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत देशपांडे यांनी केले. कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते सेवानिवृत्त सभासद सुनिल हांडे, संजय सुर्यवंशी, दशरथ गायकवाड, चंद्रकांत कोटकर, शोभा रावळ, कल्पना ठाकरे, वसंत बोडके, बेबी सोमासे तसेच ५० वर्षात पतसंस्थेचे झालेले पदाधिकारी संस्थापक सदस्य ज. ग. मेतकर, संस्थापक अध्यक्ष डि. के गद्रे , पो. द.टिळे, मुरलीधर शेळके, भगवान नेरकर, मदन शिंदे, दिलीप वाणी, ङि.यु. अहिरे, दिपक वाकळे, अश्विनीकुमार येवला, संजय सुर्यवंशी, विजय वडुलेकर यांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात पतसंस्थेचे संस्थापक सदस्य ज. ग. मेतकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्राची सराफ, उज्वला भोई, मनिषा मानकर यांनी केले. आभार पतसंस्थेचे मानद चिटणीस राजेंद्र गायवन यांनी मानले. या कार्यक्रमानंतर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत मानद सचिव राजेंद्र गायवन यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले. सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेत चेअरमन देशपांडे यांनी सभासदांना ८ टक्के लाभांक्ष जाहीर केला. सभेला संचालक सभासद उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button