रोटरी क्लबचा हरित भिगवणचा संकल्प | पुढारी

रोटरी क्लबचा हरित भिगवणचा संकल्प

भिगवण : पुढारी वृत्तसेवा: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भिगवण रोटरी क्लबने हरित भिगवणचा संकल्प हाती घेत अवघे भिगवण देशी झाडांनी हरित करण्याचा विडा उचलला आहे. प्रायोगिक तत्त्वावर पन्नास झाडे लावण्यात आली, ही लावलेली झाडे सुरक्षित असावीत यासाठी ट्री गार्डचा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी हरित भिगवणचा संकल्प हाती घेत परिवर्तन फाउंडेशन व भिगवण ग्रामपंचायतीनेही वृक्षारोपण करून गावाच्या वैभवात भर टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

त्यात आता रोटरीनेही हातभार लावल्याने गावात बर्‍यापैकी पर्यावरणाचा समतोल जाणवू लागला आहे. मात्र, अजून त्यासाठी मोठ्या इच्छाशक्तीची गरज आहे. या वेळी बोलताना रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की, भिगवण व परिसरात सर्व देशी प्रकारची दोन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. संस्थापक, अध्यक्ष सचिन बोगावत म्हणाले की, रोटरीच्या वतीने फक्त वृक्षारोपण नाही तर त्याचे संवर्धनही करण्यात येणार आहे.

या संकल्पनेला भिगवणसह परिसरातील विविध सामाजिक संस्था यात सहभाग घेणार आहेत. याप्रसंगी डॉ. अमोल खानावरे, संपत बंडगर, रियाज शेख, महेश शेंडगे, कमलेश गांधी, दत्ता धवडे, वैभव काका, मुंगळे काका,पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, दत्तात्रय खुटाळे आदी उपस्थित होते. नियोजन रणजित भोंगळे, नामदेव कुदळे, औदुंबर हुलगे, संतोष सवाने, थॉमस मथाई, तुषार क्षीरसागर यांनी केले.

हेही वाचा

नगर : घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी गैरवापर

शेतकर्‍यांना एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे धडे

शिक्रापूर गावठाणचा विजेचा प्रश्न अखेर सुटला

Back to top button