वीज खांबांच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

वीज खांबांच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा: मागील पंधरा दिवसांपूर्वी वादळी वार्‍यात मळद (ता. दौंड) परिसरात पडलेल्या वीज खांबांच्या व तारांच्या दुरुस्तीचा मुहूर्त वीज वितरण कंपनीला मिळत नसल्याचे दिसत आहे. मंगळवारी(दि.5) मळद परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने ढोले – पाटील फार्म परिसरातील पठारावरील 15 ते 16 विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने शेतकरी विजेअभावी पिकास पाणी देऊ शकलेले नाहीत शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

ऊस लागवडीचा हंगाम ही वाया जाऊ लागला आहे. याबाबतची तक्रार शेतकर्‍यांनी वारंवार वीज वितरणकडे करूनही तातडीने दुरुस्ती केली जात नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त करत नुकसानभरपाईची मागणी केली आहे. वीज वितरण कंपनी ठेकेदारामागे दडत असून काम करण्यास विलंब लावत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कुरकुंभ येथील अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news