पिंपरी: चिखलीत महिलेचा विनयभंग | पुढारी

पिंपरी: चिखलीत महिलेचा विनयभंग

पिंपरी: महिलेने नकार दिल्यानंतरही जवळीक साधत, तिचा पाठलाग करणार्‍या एका इसमाविरूद्ध चिखली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 23 मे ते 16 जून या काळात घडली आहे. आरोपी अशोक चव्हाण (रा. त्रिवेणीनगर, चिखली) व फिर्यादी महिला हे शेजारी राहतात. आरोपी सतत फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करून भेटायला बोलावित होता. ‘तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यासाठी गजरा आणला आहे.

आपण फिरायला जाऊ’ असे बोलून महिलेस लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले आहे, म्हणून फिर्यादीने शनिवारी (दि.18 ) दुपारी चार वाजता चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 354 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

Back to top button