नगर : घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी गैरवापर | पुढारी

नगर : घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी गैरवापर

नगर : पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने व्यावसायिकांनी घरगुती सिलिंडरचा व्यवसाय व वाहनांसाठी वापर सुरू केला आहे. त्यामुळे दुर्घटनेचा धोका आहे, असा इशारा ग्राहक भारती संघटनेचे उपाध्यक्ष नितीन सोळंके यांनी दिला.

सोळंके म्हणाले, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर वाढला आहे. धोका पत्करून 14.2 किलोचा गॅस 19 किलोच्या सिलिंडरमध्ये पलटी करून ओतला जात आहे.

त्यामुळे आगीच्या घटना घडतात. यात सरकारी ऑईल कंपन्या आणि एलपीजी वितरक यांनी संगठीत रॅकेट चालविणार्‍यांना समाजकंटकांना पाठीशी घातले असून शासनाने याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे सोळंके म्हणाले.

Back to top button