पालखी सोहळ्यात 24 तास आरोग्य सुविधा; ग्रामीण रुग्णालय सज्ज | पुढारी

पालखी सोहळ्यात 24 तास आरोग्य सुविधा; ग्रामीण रुग्णालय सज्ज

आळंदी : पुढारी वृत्तसेवा: संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग व ग्रामीण रुग्णालय सज्ज झाले असून शहरात मुख्य पाच ठिकाणी आरोग्य तपासणी बूथ उभारण्यात येणार आहेत. याबरोबरच रुग्णालयात 24 तास आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी दिली.

आषाढी यात्रेकरिता रुग्णालयात वारकर्‍यांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले असून तीन शिफ्टमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. रुग्णालयात बाह्यरुग्ण व आंतररुग्ण, प्रयोगशाळा तपासणी, एक्स-रे विभाग 24 तास सुरू राहणार आहे. रुग्णालयाकडे उपलब्ध असलेल्या तीन रुग्णवाहिकांबरोबरच अधिकच्या तीन रुग्णवाहिका वारीकरिता उपलब्ध करण्यात येणार आहेत. रुग्णालयात 30 बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : प्रगती मैदान ट्रान्झिट कॉरिडॉरचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

वारीत ग्रामीण रुग्णालयाने पाच बूथ उभारले असून त्याकरिता एकूण आठ वैद्यकीय अधिकारी, दहा आयुष आरोग्य अधिकारी, 14 अधिपरिचारिका, सहा परिचर, तीन प्रयोग शाळा तंत्रज्ञ व तीन क्ष-किरण विभाग तंत्रज्ञ, पाच औषध निर्माण अधिकारी, 10 आंतरवासीय विद्यार्थी कार्यरत असणार आहेत. आळंदी शहरात चाकण चौक, दर्शन बारी, वडगाव रोड, ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, इंद्रायणी घाट परिसर आदी पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग रुग्ण तपासणी बूथ उभारण्यात येणार आहेत.

दि. 26 तारखेपर्यंत हे आरोग्य पथक शहरात तैनात असणार आहे. यात दोन वैद्यकीय अधिकारी, दोन अधिपरिचारिका आणि एक शिपाई कार्यरत असणार आहे. ग्रामीण रुग्णालयात एक कोविड वॉर्ड सज्ज असणार आहे. वारी यात्रा कालावधीसाठी लागणारा अतिरिक्त औषधांचा साठा सज्ज ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.

हेही वाचा

धनगर आरक्षणाचा प्रस्ताव मविआ सरकारकडूनच; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

पुणे : लग्नास नकार दिल्याने तरुणीची बदनामी

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे 72 नवीन रुग्ण

 

Back to top button