पुणे : लग्नास नकार दिल्याने तरुणीची बदनामी | पुढारी

पुणे : लग्नास नकार दिल्याने तरुणीची बदनामी

पुणे : लग्नास नकार दिला म्हणून तरुणीचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून फोटो प्रोफाईल एडिट करून त्यावर अश्लील फोटो व मेसेज मित्रांना पाठवून तरुणीची बदनामी केली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी अयान दादापीर सय्यद (रा. कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध आयटी अ‍ॅक्टनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

नागपूर : वीज पडल्याने तीन शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्युमुखी

याबाबत 20 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिने त्याला नकार दिला होता. या कारणातून आरोपीला राग आल्याने त्याने फिर्यादी तरुणीचे सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून फोटो प्रोफाईल एडिट केले. त्यावरून अश्लील मेसेज व फोटो मित्रांना पाठवून फिर्यादी तरुणीची बदनामी केली.

Back to top button