गर्भपातासाठी आता वैद्यकीय मंडळ; चोवीस आठवड्यांपुढील गर्भपाताबाबत नवी नियमावली | पुढारी

गर्भपातासाठी आता वैद्यकीय मंडळ; चोवीस आठवड्यांपुढील गर्भपाताबाबत नवी नियमावली

पुणे, पुढारी वृत्तसेवा: चोवीस आठवड्यांपुढील गर्भपाताचा सल्ला देण्यासाठी राज्यातील 35 जिल्ह्यांत स्थायी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाकडे गर्भपाताची विनंती आल्यानंतर त्यांना गर्भपाताला होकार किंवा नकार देण्याची प्रक्रिया तीन दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नियमावली बनवली आहे.

केंद्र शासनामार्फत गर्भधारणेच्या 24 आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातास स्वेच्छेने कायदेशीर मान्यता दिलेली आहे. तर गर्भधारणेच्या 24 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर वैद्यकीय गर्भपात करण्यासाठी राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेशामार्फत स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाची मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात स्थायी वैद्यकीय मंडळे स्थापन करण्यात आली आहेत.

25 जूननंतरच राज्यात मोठा पाऊस

गर्भपाताला मान्यता मिळण्यासाठी जिल्हयाच्या वैद्यकीय मंडळाकडे विनंती करता येते. हे मंडळ गर्भवती महिलेची व तिच्या अहवालाची तपासणी करून गर्भपात करणे योग्य की, अयोग्य हे ठरविण्याचा निर्णय देण्याबाबत तसेच स्थायी वैद्यकीय मंडळाची सुधारित नियमावली निश्चिती केली आहे.

…तर पाच दिवसांत गर्भपात करावा लागेल

वैद्यकीय मंडळाकडे विनंती प्राप्त झाल्यापासून 3 दिवसांच्या आत मान्यता अथवा नकार फॉर्म-डीमध्ये देणे आवश्यक आहे. वैद्यकीय मंडळाने मान्यता दिल्यास, अशी विनंती प्राप्त झाल्यापासून 5 दिवसांच्या आत वैद्यकीय गर्भपाताची प्रक्रिया योग्य समुपदेशनासह व सुरक्षिततेच्या सर्व खबरदारीसह मान्यताप्राप्त वैद्यकीय गर्भपात केंद्रात पार पाडावी लागणार आहे.

 हेही वाचा

महिला शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटात जिल्हा प्रशासनाची साथ

नेवासा : देवगड दिंडीचे मोजक्याच वारकर्‍यांसह प्रस्थान

‘गृह’पाठोपाठ संरक्षण मंत्रालयातही अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण

Back to top button