नेवासा : देवगड दिंडीचे मोजक्याच वारकर्‍यांसह प्रस्थान

नेवासा : देवगड दिंडीचे मोजक्याच वारकर्‍यांसह प्रस्थान
Published on
Updated on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील देवगड येथील समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या आषाढी दिंडीचे मोजक्याच वारकर्‍यांसह शनिवारी (दि.18) पहाटे गुरुदेवदत्त पिठाचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या नेतृत्वात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

प्रस्थानापूर्वी भगवान दत्तात्रय व सदगुरू किसनगिरी बाबांंच्या समाधीचे विधिवत पूजन वेदमंत्राच्या जयघोषात भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. 'समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा की, जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, असा गजर करत दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावर्षी मोजक्याच वारकर्‍यांच्या निघालेल्या दिंडीचे नेतृत्व नव्याने नियुक्त दत्त मंदिर देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज करत असून, दिंडीत फक्त सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पादुका दर्शनासाठी बरोबर घेण्यात आलेल्या आहेत.

दिंडीत विणेकरी नारायण महाराज ससे, गायनाचार्य रामनाथ महाराज पवार, बाळकृष्ण महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, लक्ष्मण महाराज नांगरे, 13 ते 14 वारकर्‍यांचा समावेश आहे. पहाटेच्या सुमारास निघालेल्या देवगड दिंडीचे मुरमे ग्रामस्थांतर्फे सरपंच अजय साबळे, कविता साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, रामकृष्ण मुरदारे, मारुती साबळे यांनी स्वागत केले. यानंतर बकुपिंपळगाव, देवगडफाटा येथे राजेंद्र गिते, इकबाल शेख यांनी स्वागत केले.

खडकाफाटा व घाडगे पाटील यांच्या त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात अल्पोपहार देऊन स्वागत करण्यात आले. नेवासाफाटा येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, दीपक शिंदे, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुधीर चव्हाण, शंकरराव नाबदे, सुहास पठाडे, संदीप वाखुरे, मंगेश निकम यांनी स्वागत केले. दुपारच्या सत्रात हंडीनिमगाव येथील त्रिवेणीश्वर मंदिरात दिंडी विसाव्यासाठी थांबली असता महंत रमेशानंदगिरी महाराज, सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग उभेदळ, अनिता उभेदळ, धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेशराव उभेदळ, हंडीनिमगावचे सरपंच आण्णासाहेब जावळे, भिवाजी आघाव व अन्य भक्तांनी स्वागत केले. रात्री अंबिलवादे वस्तीवर दिंडीने मुक्का होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news