25 जूननंतरच राज्यात मोठा पाऊस | पुढारी

25 जूननंतरच राज्यात मोठा पाऊस

आशिष देशमुख

पुणे : मान्सून महाराष्ट्रात पोहोचला असला, तरीही हवेचा दाब अनुकूल नसल्याने राज्यात यंदा जूनमध्ये तब्बल 70 ते 90 टक्क्यांनी कमी पाऊस झाला आहे. सध्या राज्यात हवेचा दाब 1006 हेक्टा पास्कल इतका असल्याने पाऊस अतिशय कमी पडत असल्याचे मत ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले आहे.

यंदा जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरीही पावसाचा जोर नाही. बहुतांश भागात ‘यलो अलर्ट’ दिलेला असताना पाऊस पडत नाही. याचे कारण हवेचा दाब अनुकूल नाही. सध्या राज्यात हवेचा दाब 1006 हेक्टा पास्कल आहे. पाऊस पडण्यासाठी तो 1004 ते 1002 हेक्टा पास्कल इतका हवा. मात्र राज्यातील विदर्भ वगळता उर्वरित राज्यात हवेचा दाब 1006 इतका आहे. फक्त विदर्भात सध्या हवेचा दाब 1004 हेक्टा पास्कल इतका आहे. त्यामुळे तिकडे पाऊस आहे.

अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू आजपासून मिळणार

या भागांत ‘ऑरेंज अलर्ट’

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांत 20 ते 22 जूनदरम्यान
‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

या भागांत ‘यलो अलर्ट’

पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा,
अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिममध्ये 20 ते 22 जून दरम्यान ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

राज्यात पडलेला पाऊस (मि.मी.)

कोकण : मडगाव 60.3, वैभववाडी 20.6, माथेरान 20.1, माणगाव 10.7. विदर्भ : देसाईगंज 40.6, ब—ह्मपुरी 30.3, वरोरा 30.1, अर्जुनी मोरगाव 20, कोरची 10.7, नागभीड 10.5. मराठवाडा ः निलंगा 40.2, मुखेड 40.1, अहमदपूर 20.3, चाकूर 10.9, वेणापूर 10.4. मध्य महाराष्ट्र : चाळीसगाव 10, अंमळनेर 0.6. घाटमाथा : देवपुरी, डुंगपुरी, खोपोली, अबोणे 10.

मान्सूनने 40 टक्के देश व्यापला

हवामान विभागाच्या दाव्यानुसार शुक्रवारी मान्सूनने 40 टक्के देश व्यापला आहे. महाराष्ट्र व्यापून तो गुजरात, मध्य प्रदेश व बिहारच्या काही भागांत पोहोचला, तर दुसर्‍या बाजूने त्याने वायव्य भारत व्यापला आहे. आता उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि पुढे काश्मीर, लडाख हा भाग बाकी आहे.

हेही वाचा

नगर : एसटी बस-टेम्पो अपघातात चालकाचा मृत्यू

भाजपच्या नव्या टेक्निकने दगाफटका कुणाला?

पंकजा मुंडेंची भाजपत घुसमट ; कार्यकर्त्यांची भावना

 

 

 

Back to top button