गिर्यारोहण पदविकाची प्रवेश प्रक्रिया सुरू

गिर्यारोहण पदविकाची प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे, पुढारी वृत्तसेवा : गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग, उत्तरकाशी यांच्या संयुक्त विद्यमाने गिर्यारोहण विषयात एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डिप्लोमांटेनियरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स हा अभ्यासक्रमामध्ये प्रत्यक्ष पर्वतारोहण कौशल्ये,

प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन, पर्वतातील जैवविविधता, मानवी शरीरविज्ञान, फिटनेस सायन्स, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट, गिर्यारोहण व साहसी क्रीडा विषयक कायदेशीर बाबींचे सखोल ज्ञान, गिर्यारोहण आणि संबंधित क्षेत्रात करिअरच्या संधी आणि व्यावहारिक प्रशिक्षण या सर्वांचा समावेश आहे. असा अभ्यासक्रम राबविणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ आहे, असा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news