बोपोडी चौकातील सिग्नल बंदच | पुढारी

बोपोडी चौकातील सिग्नल बंदच

बोपोडी, पुढारी वृत्तसेवा: बोपोडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिग्नल बर्‍याच महिन्यांपासून बंदच आहेत. त्यामुळे येथे राहणार्‍या स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक वेडीवाकडी वाहने चालवित असल्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे.

औंध रस्ता, भाऊ पाटील रस्ता (बोपोडी) आणि औंधकडे जाणार्‍या रस्त्यांना हा चौक जोडलेला आहे. त्यामुळे येथे सायंकाळच्या वेळेस वाहनांची गर्दी असते. पण, बर्‍याच महिन्यांपासून येथील सिग्नल बंद असल्यामुळे चालक कशीही वेडीवाकडी वाहने चालवितात. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे. हा सिग्नल लवकरात लवकर सुरू करावा,

अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. याविषयी उमेश जाधव म्हणाले, ‘मी रोज येथून जातो. या चौकातील सिग्नल नेहमीच बंद असतो. येथे सिग्नल सुरू असणे खूप गरजेचे आहे. कधी हा सिग्नल चालू असतो तर कधी नाही. हा सिग्नल कायमस्वरुपी चालू राहावा.’

हेही वाचा

ड्रेनेज फुटल्याने नाल्यात मैलापाणी; पालिका अधिकार्‍यांचे तक्रारींकडे दुर्लक्ष

आदिवासींना मिळणार आता जागेवरच दाखले; तहसीलदार तृप्ती कोलते यांची माहिती

माजी नगरसेविकेची अधिकार्‍यास शिवीगाळ; हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

Back to top button