ड्रेनेज फुटल्याने नाल्यात मैलापाणी; पालिका अधिकार्‍यांचे तक्रारींकडे दुर्लक्ष | पुढारी

ड्रेनेज फुटल्याने नाल्यात मैलापाणी; पालिका अधिकार्‍यांचे तक्रारींकडे दुर्लक्ष

वडगाव शेरी, पुढारी वृत्तसेवा: हरीनगरमधील नाल्यातील ड्रेनेज फुटल्यामुळे ओढ्यामध्ये मैलापाणी साचले आहे. याबाबत तीन महिन्यांपूर्वी नागरिकांनी ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या. पालिका अधिकार्‍यांनी काम न करता तक्रार बंद केली आहे. या मैलापाण्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. या पाण्यामुळे साथीचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

लोहगावातून येणारा ओढा विमाननगर, रामवाडी, हरीनगरमार्गे कल्याणीनगरमध्ये नदीला मिळतो. या ओढ्याला पावसाळ्यात पूर येतो. याच ओढ्यातून पालिकेने ड्रेनेज लाईन टाकली आहे. हरीनगरला नाल्यामधील दोन ड्रेनेज फुटले आहेत. या तुटलेल्या ड्रेनेजमधून मैलापाणी बाहेर वाहत आहे. या मैलापाण्याचे प्रमाण खूप आहे. या मैला पाण्याचे डबके काही ठिकाणी साचले आहे.

आदिवासींना मिळणार आता जागेवरच दाखले; तहसीलदार तृप्ती कोलते यांची माहिती

हरीनगर सोसायटीतील मैदानामध्ये पावसाच्या पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसेच मच्छरांची संख्या वाढली आहे. मैला पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. या मैला पाण्यामुळे डुकरांचा वावर वाढला आहे. याबाबत नागरिकांनी पालिका अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.

पीएमसी पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली होती. त्यांनतर नाल्यातील काम केले, असे सांगून तक्रार बंद केली, पण नाल्याचे काम अद्याप झालेले नाही. याबाबत ड्रेनेज विभागाचे अधिकारी सिद्धराम पाटील यांनी सांगितले की, ‘याबाबत दखल घेतली असून पालिकेचे कर्मचारी येऊन ड्रेनेज दुरुस्त करतील, तसेच नालासुद्धा साफ केला जाईल.’

हेही वाचा

आदिवासींना मिळणार आता जागेवरच दाखले; तहसीलदार तृप्ती कोलते यांची माहिती

माजी नगरसेविकेची अधिकार्‍यास शिवीगाळ; हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

नाशिक सिडको : विद्यार्थ्यांनी लष्कराकडे करियर म्हणून पहावे : नवनियुक्त लेफ्टनंट घंगाळे 

Back to top button