ई-गाड्यांचे चार्जिंग होणार फास्ट; इलेक्ट्रिक एसटीसाठी पुण्यात 22 चार्जिंग स्टेशन | पुढारी

ई-गाड्यांचे चार्जिंग होणार फास्ट; इलेक्ट्रिक एसटीसाठी पुण्यात 22 चार्जिंग स्टेशन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: नुकत्याच सुरू झालेल्या इलेक्ट्रिक एसटीसाठी पुण्यात 22 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात एसटीच्या पुणे विभागातील इलेक्ट्रिक एसटी गाड्यांचे चार्जिंग फास्ट होणार आहे. पुण्यातून नुकतीच पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक शिवाई एसटी बस सुरू झाली.

याचवेळी पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीच्या ताफ्यातील सर्व गाड्या इलेक्ट्रिक करण्याचे नियोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात येत्या काही दिवसांत 17 ई-एसटी बस दाखल होणार आहेत. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाकडून युद्धपातळीवर आवश्यक त्या सेवा उभारण्याचे काम सुरू आहे. त्याकरिताच पुण्यात 22 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिकांचे वाण विकसित करा; कृषिमंत्री भुसे यांची कृषी विद्यापीठांना सूचना

येथे उभारणार चार्जिंग स्टेशन

एसटी पुणे विभागीय कार्यालय : 17 चार्जिंग स्टेशन
पुणे स्टेशन, एसटी स्टँड : 5 चार्जिंग स्टेशन

एसटीच्या पुणे विभागात येत्या काही दिवसांत 17 ई-बस दाखल होणार आहेत. या गाड्या कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे या मार्गावर धावतील. त्यांच्या चार्जिंगकरिता पुणे विभागात 22 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे.

            – ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

हेही वाचा

रेल्वेत मिळणार नाही आता गरमागरम जेवण; आगीच्या घटनांमुळे रेल्वेमधील गॅस हटविला

पिंपरी : गदिमा नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत

पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये अशोक मलिकला सुवर्णपदक

Back to top button