पिंपरी : गदिमा नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत | पुढारी

पिंपरी : गदिमा नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निगडी प्राधिकारण येथील 2014 पासून सुरू असलेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इतर कारणांमुळे तसेच गेली दोन वर्षे लॉकडाऊनमुळे काम बंद होते. आता सात वर्षानंतर नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरणातील पेठ क्रमांक 26 मधील पाच हजार चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह उभारले जात आहे. सध्या नाट्यगृहातील अंतर्गत कामे पूर्ण होत आली आहेत. हॉलमधील विद्युतविषयक कामे, खोल्यांचे रंगकाम, नाट्यमंच सजावटीचे काम जोरात सुरू आहेत.

डोंबिवली : चोरीसाठी सुरक्षा रक्षकाची हत्या; मानपाडा पोलिसांचा ८ तासांत गुन्ह्याचा छडा

या नाट्यगृहामध्ये एक मिनी थिएटर, अ‍ॅम्पी थिएटर, हॉल, कलादालन असे मल्टिप्लेक्ससारखी व्यवस्था आहे. प्राधिकरणामध्ये हे नाट्यगृह साकारल्याने याठिकाणी चांगला प्रेक्षक वर्ग लाभणार आहे. शहरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांव्यतिरिक्त खासगी कार्यक्रम जास्त होत असतात. त्यामुळे नाट्यकलावंतांना व कलाकारांना कला सादरीकरणास शहरात वाव मिळत नाही.

अनेक कलाकार सरतेशेवटी पुण्याला प्राधान्य देतात. हे नाट्यगृह लवकरात लवकर उपलब्ध झाल्यास कलाकार व नाट्यकलावंतास शहरातच कलेस वाव मिळणार आहे.

नाट्यगृहाचे काम आठ ते दहा दिवसांत पूर्ण होईल. उद्घाटनानंतर नाट्यगृह खुले करण्यात येईल. अद्याप उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
– राजेश पाटील
आयुक्त, महापालिका

Back to top button